बुध्दगयेत लवकरच महाराष्ट्र सदन
राजकुमार बडोले यांना मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन*
मुंबई , दि.01-माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली . या भेटीत बुद्धगया येथे महाराष्ट्र सदन उभारण्याची मागणी केली. या सदनात सुमारे 500 बौध्द बांधव व भंतेजी राहू शकतील अशी व्यवस्था करावी असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रातील बौद्ध उपासक उपासिका आणि बौद्ध भिक्खू मोठ्या प्रमाणात बुध्दगयेला जातात. तिथे त्यांचे निवासाची सोय होत नाही. ही बाब लक्षात घ्यावी. बुद्धगयेत ५०० बौद्ध अनुयायी व बौद्ध भिक्खू राहु शकतील .असे निवासी बांधकाम करण्यात यावे अशी मागणी केली.
*वर्षाला 10 लाख महाराष्ट्रातील
पर्यंटकांची बुध्दगयेला भेट*
महाराष्ट्रातून दररोज मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध भिक्खू, बौद्धबांधव जातात. वर्षाचा आकडा सुमारे दहा लाखांवर असतो. बुद्ध गया येथे तथागत गौत्तम बुद्ध यांना ज्ञान प्राप्ती झाली. त्यामुळे संपुर्ण जगातील बौद्ध धर्मीयांसाठी हे स्थळ अतिशय पवित्र स्थान आहे. मागील अनेक वर्षापासून ही मागणी सातत्याने होत होती. ही बाब लक्षात घेवून माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या संदर्भात बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार त्यांच्याशी चर्चा करून बिहार सरकारतर्फे जागा ऊपलब्ध करावी. त्या जागेवर महाराष्ट्र सदनाचे बांधकाम करण्याची मागणी केली. याबाबत एक निवेदन दिले.
*लवकरच मंत्रालयात बैठक*
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांमी या प्रश्नावर लगेच बैठक लावण्याचे आश्वासन माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांना दिले. तसेच अधिकाऱ्यांना तातडीने बैठक लावण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रातील जे बौद्ध उपासक, उपासिका आणि बौद्ध धम्म बांधव मोठ्या प्रमाणामध्ये बुद्ध गया येथे जातात. त्यांची निवासाची सोय त्या ठिकाणी होईल. त्या ठिकाणी एकावेळी सुमारे 500 उपासक, उपासिका आणि बौद्ध भिक्खु राहु शकतील असा विश्वास माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केला.