info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  23 Oct 2022

ऋतूराजचा प्रवेश रोखला▪दहा हजार रूपयांअभावी अभियांत्रिकी प्रवेशाला मुकला

पुणे, दि.23-ही व्यथा आहे. ऋतूराज हुमणे या गुणवंत विद्यार्थ्याची. गरीबी किती क्रुर असते. ती कशी थट्टा करते. त्याचे हे  ह्दयद्रावक उदाहरण. ऋतूराज मोबाईलवर बोलत असताना. त्यांचा रडवेला आवाज कानावर पडत होता. तो माहिती देताना त्याचा कंठ दाटून येत होता. त्याची प्रचिती आल्यावर थोडं विषयातंर केलं. तेवढ्यात तो सावरला. अन् पुन्हा आपबिती सांगू लागला. तो बीई झाला. टक्केवारीत सीजीपीए 8.46 आहे. तो सुमारे 80 टक्याच्या आसपास जातो. . त्यामुळे पुण्यातील नावाजलेल्या सरकारी अभियांत्रिकी कॉलेजमध्ये नंबर लागला. त्याने  पाच-सात हजार रूपयाची जुळवाजुळव केली. पुण्याचे कॉलेज गाठले. एम.टेक. मध्ये प्रकल्प व्यवस्थापक अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावयाचा होता. तो ज्या गटातून प्रवेश घेणार होता. त्यासाठी 18 विद्यार्थांना कॉल होता. त्यापैकी 17 जणांचा प्रवेश झाला.पैशाअभावी ऋतूराजला प्रवेश न दिल्याने ती जागा रिकामी राहिली. ऑफर आली अन् प्रवेश घेतला नाहीतर त्याला प्रवेशच मिळत नाही. वर्ष फुकट जातं. ही त्याची आपबिती..!

पुण्यात असं घडलं....!

ऋतूराज निवड समिती समोर हजर झाला. समिती सदस्यांनी विचारपूस केली. त्यानंतर दीड लाख रूपये भरा . तेव्हाच प्रवेश पक्कं होईल असं त्याला सांगण्यात आलं. रक्कम ऐकताच तो हादरला. समिती सदस्यांसमोर गयावया करू लागला. तेव्हा त्याला सांगण्यात आले. किमान पन्नास हजार रूपये भरावेच लागतील. तात्पुरते दहा हजार रूपये भरण्यासही त्याच्याकडे नव्हते. ऋतूराज म्हणाला, सर मला शिष्यवृत्ती मिळेल. आता फी भरावी लागत नाही. त्याने काही मित्रांना फोन केले. मित्रांनी सांगितले. आता पैसे भरावे लागत नाहीत. शिष्यवृत्तीतून फी ची रक्कम वळती केली जाईल.   सदस्य म्हणाले, तु डायरेक्टरला भेट. त्यांनी परवानगी दिली. तर प्रवेश मिळू शकेल. तो सामाजिक न्याय खात्याच्या वेबसाईट उघडून दाखवत होता. मी शिष्यवृतीस पात्र आहे. हे सांगत होता. समिती सदस्य आमच्या वेबसाईटवर दिसत नाही असं म्हणून नकारघंटा वाजवित होते. त्याने डायरेक्टरचा फोन मागितला. तेव्हा तेवढ्या मोठ्या माणसाचा मोबाईल देण्यास नकार दिला. ऋतूराज डायरेक्टर कार्यालयात गेला. तेव्हा साहेब बैठकीत आहेत असं सांगण्यात आलं. अखेर सायंकाळचे पांच वाजले. प्रवेश वेबसाईट बंद झाली. सामाजिक न्याय खात्याचे आयुक्तांकडे हस्तक्षेपाची विनंती केली. त्यांच्याकडून सायंकाळी सात वाजता प्रतिसाद मिळाला.त्या क्षणी त्याचा प्रवेश हुकला होता. तो रडवेल्या चेहऱ्याने  गावाकडे परतला.  शिष्यवृत्ती गरजूंसाठी ...! त्यासाठी नियम, कायदे बनविण्यात आले. ते सर्व कुचकामी ठरले. त्यात काय बदल करावयाचे ते संवेदनशील सरकारने करावे. इंथे शिष्यवृत्तीही  कामी आली नाही. ऋतुराजचे हे एक प्रकरण उजेडात आले.असे किती ऋतूराज या व्यवस्थेचे बळी ठरत असतील. त्यांचा हिशेब नाही. इकडे व्यवस्था दिवाळी साजरी करीत आहे. तिकडे ऋतूराज  एम.टेक. प्रवेशाच्या चिंतेत आहे.

 एकल परिवार...!

2021 मध्ये पित्याला गमावले.अन् आता पदव्यूत्तर प्रवेश हुकला. आई, मुलगा चिंतेत आहे. कोरोनाने थैमान घातला. त्यात वडिलाचा रोजगार गेला. हाताला काम नाही. चुल पेटणे मुश्किल झाले. त्या चिंतने आजारी पडले. त्यात त्यांचा मृत्यू झाला.आई मोलमजूरी करते. त्यातून घरसंसार चालते. ऋतूराजला मोठी बहिण आहे. ती आयटीआय झाली आहे. दोघेही  कष्ट करीत शिकतात. ऋतूराज बारावी चांगल्या गुणांनी पास झाला. बीई केलं. आता एम.टेक.चे शिक्षण घेण्याचे स्वप्न  होते. त्यासाठी पुणे गाठले. त्याच्या स्वप्नावर व्यवस्थेने पाणी फेरले. ऋतूराजचे गाव खरबी.भडाऱ्यापासूव 12 किलोमीटर अंतरावर. या भागाचे आमदार, खासदार, पालक मंत्री आणि सामाजिक न्याय खात्याच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे. होतकरू मुलाला न्याय मिळवून देण्यास संघटनांनी पुढाकार घ्यावा. प्रवेश मिळवून द्यावा. एवढीच ऋतूराजची अपेक्षा आहे. निर्दयी व्यवस्थेच्या जाळ्यातून बाहेर निघण्यास तो धडपडतो आहे. ऋतूराज खचू नको. हिंमत ठेव.

 समिती सदस्य हंसत होते...!

ऋतूराज समिती सद्स्यांपुढे विनवणी करीत होता. तेव्हा सद्स्यांनी त्याला सर्वासमोर उभे केले. हा म्हणतो, शिष्यवृत्ती मिळेल. मला प्रवेश द्या. या शब्दात हेटाळणी करीत होते. ही अतिशय चीड आणणारी घटना. या घटनेची चौकशी व्हावी. नियम मदतीसाठी असतात. अन्यायासाठी किंवा गरिबीची चेष्ठा करण्यासाठी नाहीत. चुक यंत्रणेची असेल. तर शिक्षा विद्यार्थ्याला नको. ऋतूराजला एम.टेक.मध्ये प्रवेश मिळावा. तो कसा देता येईल. ते सरकारने व यंत्रणेने ठरवावे. एवढेच..!( ऋतूराज रमेश हुमणे,खरबी,जिल्हा- भंडारा. मोब.7498622471 )
▪-भूपेंद्र गणवीर
.....................BG.........................
 
अनेकांनी ऋतूराजचे बँक खाते मागितले. 
त्यांच्यासाठी  
Account No: 33524328964
Name: Ruturaj Ramesh Humane
IFSC: SBIN0002156
Branch: Jawaharnagar
Branch Code: 2156

▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪¤▪▪▪