पल्स पोलिओ मोहिमेत 93 टक्के लसीकरण
नागपूर,दि.4 : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत नागपूर जिल्ह्यात ग्रामीण भागासह शहरीभागात नियोजनबद्ध लसीकरण मोहिमेमुळे 93 टक्के लसीकरण पार पाडले. जिल्ह्यात 0 ते 5 वर्षे वयोगटातील एकूण 194014 उद्दिष्टापैकी 180676 म्हणजेच 93.01 टक्के लाभार्थ्यांना पोलिओ लसीचा डोस पाजण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी डागा स्मृती स्त्री शासकीय रुग्णालय येथे बालकांना पोलिओ लस दिली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यावेळी उपस्थित होते.
तद्नंतर जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी रुग्णालयातील सोनोग्राफी, एक्स रे कक्ष, नवजात शिशू अतिदक्षता विभागाची पाहणी करून मार्गदर्शन केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रेवती साबळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.असिम ईनामदार, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अख्तर, अतिरिक्त जिल्हाशल्य चिकित्सक प्रविण नवघरे, जिल्हा प्रशिक्षण पथकाचे डॉ. सचिन हेमके, वरिष्ठ बालरोग तज्ञ जयश्री शंभरकर, डॉ. सुरेश मोटे, वैद्यकीय अधिकारी, परिसेविका, अधिपरिचारिका रुग्णालयातील सर्व आरोग्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
5 ते 9 मार्च पर्यंत राबविण्यात येणाऱ्या आय.पी.पी.आय. मोहिमेत पल्स पोलिओ लसीपासून वंचित असणारे 0 ते 5 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना पोलिओ लस देण्यात येणार आहे.