5 कोटींची ठकबाजी, तिघांना अटक
आरोपी कोल्हापूर व मुंबईतील
नागपूर, दि.20 - आर्थिक गुन्हे शाखा पथकने सुमारे 5 कोटी 39 लाख रूपयांची ठकबाजी उघडकीस आणली. या प्रकरणी तिघा जणांना अटक केली. त्यात मंदार कोलते, नागपूर , गोयल उर्फ सुरज डे, कांदिवली, मंगेश पाटेकर उर्फ दिनेश कदम, मुंबई यांचा समावेश आहे.
या तिघांनी दिघोरी येथील अंकुरकुमार अग्रवाल यांना एक्स्ट्रीम नेटवर्क इंडिया या कंपनीत गुंतवणूक केल्यास 15 ते 20 टक्के परतावा मिळेल असे आमिष दिले. कंपनीचे बनावट एजंट बनून बनावट डिमांड ड्राप दिला आणि 5 कोटी 39 हजार रूपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले.आरोपींनी ही रक्कम आपल्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये वळती केली.
या प्रकरणात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर अंकुरकुमार यांनी आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली. त्या आधारे पोलिसांनी 18 जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविला.
आरोपींपैकी मंदार यास कोल्हापुरात,गोयल व पाटेकर यास बंगळूरला अटक करण्यात आली. त्यांच्याकडून नोटा मोजण्याची मशिन, पावती पुस्तके व मोबाईल जप्त करण्यात आले. आरोपींची 20 नोव्हेंबरपर्यत पोलिस कस्टडी घेण्यात आली. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.