info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  12 Nov 2022

बहुजन महिलांची सोलर उत्पादक संस्था वर्धेत

 
-माजी मंत्री राजकुमार बडोले यांची भेट
वर्धा, दि.12- या जिल्ह्यातील कवठा/झोपडी येथ तेजस्वी सोलर एनर्जी महीला मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था आहे. ही बहुजन महिलांची  देशातील एकमेव संस्था आहे. तिला माजी सामाजिक न्यायमंत्री मंत्री राजकुमार बडोले यांनी भेट दिली.
सदर औद्योगिक संस्थेच्या सोलर युनिटला विशेष घटक योजना नाविन्यपूर्ण योजनेतून २.७१ कोटी रुपये २०१८ मध्ये जिल्हा नियोजन समिती ने मंजूर केले व उत्पादन सुरू झाले. कोरोना काळात कामाला गती मंदावली. या संस्थेत सोलर पॅनेल, स्ट्रीट लाईट,स्टडी लॅम्प, सोलर टार्च,सोलर कंदील व सोलर मोबाईल चार्जर इत्यादी उत्पादने असुन आय आय टी मुंबई यांनी त्यांना प्रशिक्षण दिले आहे. संस्थेच्या अध्यक्ष संगीता  वानखेडे मॅडम यांनी संस्थेच्या कामकाजाबाबत माहीती दिली. सोलर एनर्जी क्षेत्रांतील मागासवर्गीय महीलांची ही देशातील एकमेव संस्था असुन राज्य सरकार व सामाजिक न्याय विभागाने त्यांना योग्य कामाचे ऑर्डर देणे अपेक्षित आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केली.शासन व मेडा त्यांना नक्की सहकार्य करेल अशी अपेक्षा व्यक्त केली.