info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  16 Nov 2024

बडोलेंची प्रचारात आघाडी, विरोधकांना भरली धडकी

बडोले यांचा माहौल, विरोधकांना धडकी

जिल्हा प्रतिनिधी
गोंदिया, दि.16 -महायूतीचे उमेदवार राजकुमार बडोले मोरगाव/अर्जुनी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढत आहेत. त्यांनी बहुतेक गावांना भेटी दिल्या. लोकांसोबत संवाद साधला. विकासाची हमी दिली. लाडली बहिण योजनांचा निधी वाढविण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या या प्रचाराने व लोकांच्या प्रतिसादाने विरोधकांना धडकी भरली आहे.

बडोले यांची प्रचाराची सुरवात दिवस उजाडताच सुरू होते. रात्री उशिरापर्यंत चालते. गावातील कार्यकर्ते त्यांच्या नाश्ता व जेवणाची सोय करतात. गावागावांत महिला आरतीने ओवाळतात. लोक पुष्पहार घालून स्वागत करतात. लोकांचे मिळणारे प्रेम बघून ते गदगद होतात. पुढे दुसऱ्या गावांमध्येही असेच दृश्य असते. या चर्चेने विरोधकांची दमछाक वाढली आहे. 

त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार महाविकास आघाडीचे बन्सोड हे मुळचे तिरोड्याचे उमेदवारीसाठी मोरगाव/अर्जुनीत मुक्कामाला आहेत. त्यांना कॉग्रेस पक्षातूनच विरोध आहे. बाहेरचा पार्सल परत पाठवा अशी मागणी करीत 15 इच्छूकांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अडवून घोषणाबाजी केली होती.उमेदवार बदला म्हणून दबाव आणला होता. त्यांचे न ऐकल्याने अनेक जण घरी बसले. काही जण विरोधात प्रचाराला लागले. त्यामुळे बन्सोड यांना चांगल्या प्रभावी कार्यकर्त्याचा कमालीचा तुटवडा जाणवतो.

कॉंग्रेस पक्षाचे बंडखोर मैदात उतरले. त्यामध्ये अभय लांजेवार एक आहेत. निवडणूक आल्या की मिळेल त्या पक्षाची उमेदवारी घेणारे अशी त्यांची इमेज आहे. बाकी पांच वर्ष कोणाचे फोनही उचलत नाही. काम करणे दूर अशी प्रतिमा आहे. तिच त्यांना भोवते आहे. माजी आमदार मनोहर चंद्रिकापूरे यांनी पांच वर्ष लोकांसोबत विशेष संपर्क ठेवला नाही.ठेकोदारांवर विसंबून राहिले. पक्ष आणि भाजपच्या सर्वेत ते तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे पक्षाने त्यांची उमेदवारी कापली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खा. प्रफुल्ल पटेल यांच्यात यावर प्रदीर्घ चर्चा झाली. त्यातून राजकुमार बडोले यांना घड्याळ चिन्हावर  लढविण्याचा फार्मूला अंतिम झाला. यामुळे मनोहर  चंद्रिकापूरे घरी बसले. त्याचा  मुलगा सुगत चंद्रिकापूरे अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरले. मधल्या काळात मुंबई गाठून एकनाथ शिंदे यांच्याकडून रसद आणल्याची चर्चा आहे. या मतदार संघात दोन्ही शिवसेना गट प्रभावहिन आहेत.  त्यांना पक्षातील लोकांची साथ नसल्याने ते प्रचारात एकटे पडलेत. उलट प्रफुल्ल पटेल, राजू जैन आणि राकॉं पदाधिकाऱ्यांनी पुर्ण शक्ती राजकुमार बडोले यांच्या मागे उभी केल्याने बडोले यांचा माहौल बनला आहे. याशिवाय भाजपचे कर्मठ कार्यकर्ते बडोले यांच्या प्रचारारात रात्रदिवस राबत आहेत. वर्षभरापूर्वी भाजपमध्ये आलेले रत्नदीप दहिवले हे अपक्ष म्हणून मैदानात उतरले. त्यांना त्यांच्या गावातूनच विरोध आहे. शिक्षण संस्था आहे. पैसा आहे. तो मतदार संघात जिरवत आहेत. कार्यकर्त्यांचा अभाव त्यांची सर्वात मोठी डोकेदुखी ठरली आहे.