info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  21 Mar 2024

*नागपूर विभागात एक नामनिर्देशनपत्र दाखल*


 
*नागपूर दि.२०* : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४च्या पहिल्या टप्प्यासाठी आज नागपूर विभागातील पाच लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक अधिसूचना जारी झाली असून नामनिर्देशपत्र भरण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये एक नामनिर्देशनपत्र दाखल  झाले आहे. 

        नागपूर लोकसभा मतदारसंघातून व्यंकटेश्वरा महा स्वामीजी यांनी भारतीय जनता पक्षाच्यावतीने एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.   

    विभागातील भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, रामटेक आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नाही. 

      विभागातील पाचही लोकसभा मतदारसंघासाठी बुधवार दिनांक २० मार्च रोजी अधिसूचना जारी झाली आहे. २७ मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल तर २८ मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. ३० मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर ४ जून रोजी मतमोजणी  होवून निकाल जाहीर होणार आहे. ६ जून पर्यंत  आदर्श आचारसंहिता लागू राहणार आहे.