info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  06 Dec 2023

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विधान भवनात आदरांजलीनागपूर , दि. ६ : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार , भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज विधानभवन येथे महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली .

               विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे , विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार , विधानसभा सदस्य अजय चौधरी , विधानमंडळाचे सचिव (१) जितेंद्र भोळे , सचिव ( २ ) डॉ. विलास आठवले , सह सचिव मेघना तळेकर , शिवदर्शन साठ्ये , उपसचिव (विधी ) सायली कांबळी , सुभाष नलावडे , उप सचिव पूनम ढगे , रवींद्र जगदाळे , मुख्य सुरक्षा अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार व गुलाबापुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.