info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  09 Dec 2021

भाजपची सहल जिंकणार की कॉंग्रेसची आयात..!*

*भाजपची सहल जिंकणार की कॉंग्रेसची आयात..!* 

नागपूर,दि.9-  नागपूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणूकीसाठी उद्या  10 डिसेंबर रोजी मतदान आहे. एकूण ५६० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दरम्यान भाजप व कॉंग्रेस दोन्ही पक्षांनी विजयाचा दावा केला असला तरी भाजपची सहल जिंकणार की कॉंग्रेसची आयात हे मतमोजणीनंतर 14 डिसेंबर रोजीच कळेल.

 भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसने डॉ.रवींद्र भोयर यांना मैदानात उतरविले आहे. भोयर हे भाजपची किती मते फोडतात. यावर हारजित ठरणार आहे.
 भोयर यांनी भाजपचे अनेक नगरसेवक आपल्या सोबत असल्याचा दावा केल्याने  निवडणूकीला रंगत आली. भोयर यांच्या विधानानंतर भाजप सावध झाली. त्यांनी आपल्या मतदारांना सहलीवर रवाना केले. सहलीवरून ते सरळ मतदान केंद्रावर पोहचणार आहेत. राजकीय सहलीचा खर्च किती कोटीवर गेला. हे भाजपलाच माहित.मात्र  कॉंग्रेसने या खर्चावर आक्षेप घेतल्याने निकाला नंतरही हा वाद रंगणार.
 अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांच्या  उमेदवारी अर्जावर ६ भाजप सदस्य सूचक  होते. त्यापैकी किती साथ देणार हे सुध्दा कळेल.  देशमुख यांचा निवडणूक खर्च किती! हा प्रश्न उत्सूकता वाढविणारा ठरणार आहे. 
तसेच प्रचारात ते कुठे कुठे गेले.यावर अनेकांची नजर होती. त्यावरही चर्चा रंगेल. सध्या सहलीचे राजकारण रंगलेले आहे. तेवढीच उमेदवार अदलाबदलीची चर्चाही तेजीत आहे.